
चांगल्या भाषेत समजावून देखील कळत नसल्याने नागरिकाने शोधला अजब उपाय
“येथे कचरा टाकणारा दोन बापाचा”, अजब बोर्डाची सर्वत्र चर्चा!
अनेकवेळा लोकांना चांगल्या भाषेत समजावून देखील कळत नाही त्यावेळी अनेकवेळा कायद्याचा बडगा दाखवला जातो नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नका अशा प्रामाणिकपणे सभ्य भाषेत लावलेला बोर्ड फाटला परंतु लोकांची सवय काही गेले नाही रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे ग्रामपंचायत हद्दीत गणेश कॉलनी रोडवर काही नागरिक मनाई असतानाही वारंवार कचरा टाकत आहेत. याठिकाणी पंचायतीने कचरा न टाकण्याबाबत, दंड करण्याबाबत अनेक फलक लावून झाले, मात्र काही उपद्व्यापी नागरिक पहाटे किंवा रात्रीच्या सुमारास याठिकाणी कचरा फेकून जातात. या बेजबाबदार नागरिकांच्या अशा वागण्याने पंचायतही कंटाळली. मात्र याठिकाणहून जाताना कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरतेयच, तसेच जातायेता हा कचरा सुज्ञ नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. शेवटी कचरा टाकणाऱ्या या काही बेजबाबदार नागरिकांच्या वर्तनाने कंटाळलेल्या, वैतागलेल्या नागरिकाने याठिकाणी एक अजबच बोर्ड लावला. “येथे कचरा टाकणारा दोन बापाचा! आता टाक कचरा!” असा बोर्ड लावत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या या बोर्डची परिसरात चर्चा असून आता या बोर्डने तरी त्या बेजबाबदार नागरिकांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वैतागलेल्या नागरिकाने शोधलेला हा अजब उपाय परिणामकारक ठरतो की नाही हे आता लवकरच कळेल
www.konkantoday.com