- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाच्या शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. या दौर्याचा प्रारंभ दक्षिण कोकणातून सावंतवाडी येथून होणार असून त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मागील घडलेल्या राजकीय घडामोडी व त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करणार असल्याचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या दौर्यानिमित्त मंगळवारी येथील खासदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या दौर्यात त्यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, वैभव नाईक यांसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या संवाद यात्रा दौर्याचा प्रारंभ ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४५ वा. सावंतवाडी येथून होणार आहे. दुसर्या दिवशी कणकवली येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीकडे प्रयाण करतील. ५ फेब्रुवारीला जिल्ह्याच्या दौर्यावर येत असताना राजापूर-रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण येथे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राजेंद्र महाडीक यांनी दिली.www.konkantoday.com
Back to top button