महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने २५ सप्टेंबरला सामूहिक रजा व जिल्हास्तरावर महामोर्चा आंदोलन.
वीस पटापर्यंतच्या शाळांना एकशिक्षकी करून तेथे सेवानिवृत्त शिक्षकाची किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे धोरण अन्यायकारक आहे. या निर्णयाचा फेरविचार करून हा शासननिर्णय रद्द करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने २५ सप्टेंबरला सामूहिक रजा व जिल्हास्तरावर महामोर्चा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा नेते प्रदीप पवार यांनी दिली.राज्य सरकारने एक ते वीस पटापर्यंतच्या शाळांना एकशिक्षकी शाळा करून त्या शाळेत कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करताना सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे; मात्र या निर्णयास सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.