
रत्नागिरी जिल्ह्यात मुदतबाह्य ९०० वाहनांवर आरटीओंची कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य, अंतर्गत जिल्हा मार्गावर वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणार्या ६,१५२ वाहनांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ कोटी ६० लाख ७३ हजार रु. चा दंड व ७७ लाख ३६ हजार कर वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक दंड वसुली मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलर या वाहनांकडून करण्यात आले असून ओव्हरलोड वाहतूक करणार्या ३९५ ट्रकना १ कोटी ११ लाख रू. चा दंड करण्यात आला. तर जिल्ह्यात मुदत संपलेल्या ९०० वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालकासह अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, विनाहेल्मेट, परवाना नसणे, मुदतबाह्य वाहने, पियुसी नसताना वाहन चालविणे अशा वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाते. सन २०२४-२५ या आर्थिक र्वात एकूण ६,१५२ वाहनचालकांवर कारवाई करून २ कोटी ६० लाखांचा दंड करण्यात आला.




