जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २४ जागांसाठी आज मतदान.
जम्मू काश्मीर*: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. २३ लाखांहून अधिक पात्र मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत. २४ विधानसभा जागांसाठी ९० अपक्ष उमेदवारांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य आज (१८ सप्टेंबर) मतपेटीत बंद होणार आहे.जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४ विधानसभा जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये काश्मीरमधील १६ आणि जम्मूमधील ८ जागांचा समावेश आहे.जम्मू-काश्मीरमध्ये एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या सर्व टप्प्यांचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहेत. ९० जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी १३ प्रमुख पक्षांमध्ये स्पर्धा आहे.