रत्नागिरीच्या कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम व मित्र पक्ष राष्ट्रवादीने काम केलंच नाही- कॉग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर.

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात रत्नागिरी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काम केलंच नाही, असा गभीर आरोप रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकरांनी केला . तर काॅग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं नाही त्यामुळे रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात काॅग्रेस तीन नंबरवर फेकली गेली.

काॅग्रेसच्या पक्ष अध्यक्षांनी काम केलं नाही याचा अहवाल पक्ष श्रेष्ठींक़डे पाठवला असल्याची माहिती बांदीवडेकरांनी दिलीय.रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या आघाडीत काॅग्रेसचे नवीनचंद्र बांदीवडेकर तीन नंबरवर फेकले गेले

Related Articles

Back to top button