
आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेली वृद्धा शॉक लागून जखमी
रत्नागिरी ः विद्युत तारेचा शॉक लागून असुर्डे गावातील पार्वती देवू थोटम (७०) या किरकोळरित्या जखमी झाल्या आहेत.
पाली येथील आठवडा बाजारात अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी पार्वती थोटम आल्या होत्या. पाली ग्रामपंचायत नजिकच्या मच्छिमार्केटमधील विद्युत खांबावरील अर्थिंगचा स्पर्श झाल्याने पार्वती थोटम यांना धक्का बसला. स्थानिकांनी त्यांना पाली ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.