
मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये अडवली शिंदे समितीची कार
मराठा आरक्षणासाठी धाराशिवमधील मराठा आंदोलनक आक्रमक झाले असून विविध मार्गाने आपली नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान राज्य सरकारने योग्य कागदपत्र तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्याकरिता एक समिती नेमलीय. निवृत्त न्यायमूर्ती शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आलीय. आज या समितीचे सदस्य धाराशिवला आले असताना त्यांना तेथील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. आंदोलकांनी समितीच्या सदस्यांची कार अडवत. त्यांना काळे झेंडे दाखवले आणि शिंदे समिती गो बॅकच्या घोषणा दिल्या. (‘साम टीव्ही’चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान या समितीला डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ही समिती नेमण्यात आलीय. या समितीने मराठवाडा दौरा देखील केलाय. ही समिती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निजामकालीन कागदपत्रांचा अभ्यास करत आहे. यासाठी तेलंगणा राज्याकडे निजामकालीन कागदपत्रे मागितली आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालेला आहे. विविध पद्धतीची अनोखी आंदोलने करण्यात येत आहेत. भूम तालुक्यातील ईट या गावात मराठा युवक कृष्णा चव्हाण हे बाभळीच्या काट्यावर झोपून उपोषण करत आहेत. तालुक्यातील डोकेवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचे फोटो हटवून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज ,राजमाता जिजाऊ यांचे फोटो बसविण्यात आले आहेत
www.konkantoday.com