रत्नागिरी तालुक्यातील नेवरे ढोकमळे समुद्रकिनारी अनोळखी मृतदेह.
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे ढोकमळे समुद्रकिनारी अनोळखी मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृताचे वय अंदाजे ३५ असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नेवरे ढोकमळे समुद्रकिनारी अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक रहिवाशांना सर्वप्रथम ही बाब निदर्शनास आली. त्यानुसार या घटनेची खबर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठविला.www.konkantoday.com