
भुईबावडाई घाट पायथ्याशी रिंगेवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देतांना पुणे- पणजी ही हिरकणी बस पलटी
भुईबावडाई घाट पायथ्याशी रिंगेवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देतांना पुणे- पणजी ही हिरकणी बस पलटी झाली. या बसमधून जवळपास ७० प्रवासी प्रवास करत होते.या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेकांना प्रवाशांना मुका मार लागला आहे. ही घटना मंगळवारी (दि.17) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.गगनबावडा बसस्थानकातून दुपारी २.३५ मिनिटांनी चालक राजू देवराम सोघम व वाहक राजू यादव रा. कोल्हापूर घेवून रवाना झाले. भुईबावाडा घाटाच्या पायथ्याजवळ रिंगेवाडी नजीक पुलानजीक बस आली असता समोरून येणाऱ्या ट्रकने बाजू मारली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस पुलाचे रेलिंग पाईप तोडून पलटी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.