
लागबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची तयारी सुरू केली.
गणपती बाप्पाचा गणेशोत्सव यंदा जोरदार साजरा होत आहे. आता विसर्जनाची घटिका समीप येऊन ठेपली आहे. उद्या भाविक आपल्या लाडक्या गणरायाला अनंत चतुदर्शीला भावपूर्ण निरोप देतील.आता विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. लागबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. यामुळे चरण स्पर्शची रांग सकाळी 6 वाजता बंद करण्यात आली असून मुखदर्शनाची रांगही आज रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे. उद्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आज रोजच्या तुलनेत लालबाग परिसरात भाविकांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे.