
रत्नागिरीत ऑक्टोबरमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण.
रत्नागिरी शहरात अरबी समुद्रालगत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूटी पुतळा, थिबा राजवाड्यासमोर उभारण्यात येणार्या जागतिक पातळीवरील थ्रिडी मल्टीमिडिया शो आणि लोकमान्य टिळक मोफत रूग्णालयाचे लोकार्पण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या सोबतच रत्नागिरी शहरातील अन्य विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.ऑक्टोबर १, २ आणि ३ तारखेला रत्नागिरी शहर आणि परिसरात होणारे विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी रत्नागिरीत होवू घातलेल्या राज्य उत्पादन शुल्काच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. या सोबत गेली ४० वर्षे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या विचाराने प्रेरित होवून काम करणार्या नेत्यांच्या मागणीचाही विचार करण्यात येणार आहे. यांच्या मागणीनुसार राज्य उत्पादन शुल्क इमारत परिसरात थिबा राजाने प्रस्थापित केलेली गौतम बुद्धांची मूर्ती असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्धविहार उभारण्यासाठी साडेसात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या विहाराचा भूमिपूजन सोहळाही यावेळी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.www.konkantoday.com