गांजा वाहतूक प्रकरणी फरारीचा कसून शोध
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटानजिक ७ लाख ३३ हजार रुपये किंमतीच्या २२ किलो जप्त केलेल्या गांजा वाहतूक प्रकरणी पसार झालेल्या संशयिताचा पोलादपूर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाकडून कसून शोध जारी आहे. गांजा वाहतूक प्रकरणात मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलादपूर पोलिसांकडून सार्या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे.गांजा वाहतूकप्रकरणी मंगेश मधुकर भिलारे (२७, गुरेधर महाबळेश्वर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा सहकारी विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या (रा. शाहूनगर पाचगणी, सातारा) हा संशयित पलायन करण्यात यशस्वी ठरला.www.konkantoday.com