खेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे रक्कम पुन्हा खात्यात जमा.
खेड तालुक्यातील एकाच्या बँक खात्यातून अचानक पैसे वजा होताच तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक नितीन भोयर व हवालदार नंदकुमार घाणेकर यांनी तत्परता दाखवल्याने वजा झालेली रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा झाली.विशाल मोरे हे महावितरणच्या वीज मीटर रिडींग घेण्याचे काम करतात. ३० ऑगस्ट रोजी त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला असता कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत तुमच्या मोबाईलवर एक स्किम कार्यान्वित झाल्याने तुमचे पैसे वजा होत असल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला. त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यामधून ३२ हजार २१६ रुपये वजा झाले होते. त्यांनी तातडीने पोलीस स्थानक गाठत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. यानंतर पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस कर्मचारी वैभव ओहोळ यांनी बँकेशी संपर्क साधत घडलेला प्रकार कथन केला. या तत्परतेमुळे मोरे यांच्या खात्यातून वजा झालेली रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली याबद्दल मोरे यांनी पोलिसांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. www.konkantoday.com