
कोल्हापूर ते पुणेदरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी यशस्वी; ४० सेकंदांत गाठला ११० किमीचा वेग पुणे – पुण्याहून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची शनिवारी (ता. १४) चाचणी घेण्यात आली. ताशी १८० किमी वेगाने धावण्याची क्षमता असणाऱ्या वंदे भारतसाठी ११० किलोमीटरचा वेग निर्धारित केला आहे. या रेल्वेचे एक्सलरेशन अत्यंत चांगले आहे.
अवघ्या ४० सेकंदांत ११० किमीच्या वेगाने धावू शकते. इतका वेग असला, तरी याचा रायडिंग इंडेक्स हा २. ५ इतका आहे. हा देशात धावणाऱ्या रेल्वेपैकी सर्वांत चांगला निर्देशांक समजला जातो. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे.कोल्हापूरहून शनिवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने निघाली. मार्गातील विविध स्थानकावर थांबत ज्या सेक्शनमध्ये निर्धारित केलेल्या वेग मर्यादाचे पालन करीत दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी पुणे स्थानकावर दाखल झाली.आठ डब्याच्या रेल्वेमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्यासह पुणे विभागाचे अधिकारी, वंदे भारतच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर ही रेल्वे दाखल झाली. त्यानंतर मुंबईच्या बाजूच्या यार्ड क्रमांक एकमध्ये ही रेल्वे ठेवण्यात आली. सोमवारी (ता. १६) याचे लोकार्पण होणार आहे.*वीस चालकांना प्रशिक्षण…*वंदे भारत एक्सप्रेसच्या कॅबमधील यंत्रणा, अन्य रेल्वे इंजिनमधील यंत्रणेत फरक आहे. शिवाय वंदे भारतचे एक्सलरेशन, कंट्रोलिंग हे पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या सुमारे २० चालकांना वंदे भारत चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हेच चालक पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी एक्सप्रेसला मिरज स्थानकापर्यंत चालवतील, मिरजला याचा क्रू बदलेल.*वैशिष्ट्ये काय?** ४० सेकंदांत ११० किलोमीटरचा वेग गाठणे* हाय टेंसाइल बोगी, त्यामुळे प्रवास आरामदायक* ईबीडी (इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स) : २७० मीटर*१८ सप्टेंबरला प्रवासी सेवेत…*पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे सोमवारी उद्घाटन होणार आहे. बुधवार(ता. १८) पासून ही रेल्वे प्रवासी सेवेत धावणार आहे. रविवारपासून याचे प्रवाशांना आरक्षित तिकीट काढता येईल.