
कणकवलीतील 2 हजार बाकडी वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप; 2500 ची बाकड्याची किंमत लावली 12500 रुपये!
कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत जो निधी वितरीत झाला तो त्याठिकाणीच झाला पाहिजे. खरं म्हणजे ज्या पध्दतीने आ. नितेश राणे यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि समाजकल्याण ऑफीसरला त्या ठिकाणी लिहायला लावलं की आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून हा निधी वितरीत केला आहे. पण आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून जवळजवळ अडीच कोटीचा हा कॉन्ट्रॅक्ट असून या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोठा भ्रष्टाचार आ. नितेश राणेंना टक्केवारी पोचवून झालेला आहे. कणकवली विधानसभेतून २ हजार लोखंडी बाकडी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.*लोखंडी बाकड्यांची किंमत २५०० ते ३००० रुपये नाही, त्यांची किंमत १२ हजार ५०० रुपये एवढी लावण्यात आली *- सुशांत नाईक*काही दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे माहितीचा अधिकारची आम्ही माहिती मागवली होती. आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली विधानसभेतून जवळजवळ २ हजार लोखंडी बाकडी वितरीत करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्या मध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे , यासाठी आम्ही माहिती मागवली होती. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माहितीचा अधिकार यांच्या ऑफीस मधून ही पूर्ण माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्याच जे टेंडर निघालेलं आहे ते स्कायलाईन ग्रुप कोल्हापूर यांच्या नावाने काढलेले आहे. आणि ते टेंडर निघाल्यानंतर जवळजवळ २५० ठिकाणी या लोखंडी बाकडी निघालेल्या आहेत. २५० ठिकाणी म्हणजेच वितरीत करताना म्हणजेच एका ठिकाणी ८ लोखंडी बाकडी अशा तत्वावरती त्या वितरीत करण्यात आल्या होत्या. म्हणजे जवळजवळ २ हजार लोखंडी बाकडी वितरीत करण्यात आलेल्या आहेत. ज्या लोखंडी बाकडी किंमत २५०० ते ३००० हजार पण नाही , अशा त्या लोखंडी बाकडी एकाची किंमत जवळजवळ १२ हजार ५०० रुपये एवढी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे किती मोठा भ्रष्टाचार या समाजकल्याणच्या माध्यमातून आणि नितेश राणेंच्या प्रयत्नातून झालेला आहे , हे दिसून येतं. आणि हे या माहितीच्या अधिकारातून उघड झालेलं आहे,असा आरोप सुशांत नाईक यांनी केला.*नितेश राणेंनी जी टक्केवारी घेतलेली आहे , त्यामध्ये आयुक्त तुम्ही सामील आहात का?*खरतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत हा निधी वितरीत करण्यात आला होता. हा वितरीत झालेल्या निधीच्या लोखंडी बाकडी वर आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून झाला आहे , असे लिहिले होते. खरतर आता तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाल तेव्हा बघा या लोखंडी बाकड्यांना गंज चढलेला आहे. म्हणजेच २ महिने सुध्दा या लोखंडी बाकड्यांना झालेले नाहीत. आणि त्यावर गंज लागलेला दिसून येत आहे. म्हणजेच या लोखंडी बाकडीवर पावडर कोटींग सुध्दा केलेले नाही, हे सिध्द होत आहे. खरतर हा निधी समाजाच्या अंतर्गत वितरीत करण्यासाठी हा निधी होता. तर मला समाज कल्याण आयुक्त्यांना आणि सहाय्यक आयुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की , ज्या ठिकाणी त्या बॅंचेस ठेवण्यात आल्या पाहिजे, त्या ठिकाणी त्या ठेवण्यात आलेल्या आहेत का ? आणि या मध्ये नितेश राणेंनी जी टक्केवारी घेतलेली आहे , त्यामध्ये तुम्ही सामील आहात का ? नायतर हा भ्रष्टाचारावरती बोट दाखवा आणि याच्यावरती कारवाई करा. आणि तुम्ही जर कारवाई केली तर तुमच्या ऑफीस समोर येवून आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ज्या ठिकाणी समाज कल्याणचा निधी आहे. त्याठिकाणी तो वितरीत झाला पाहिजे,असा इशारा सुशांत नाईक यांनी दिली.