
वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी बँकेच्या नव्या संचालक मंडळाला रिझर्व बँकेने जबरदस्त दणका
वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी बँकेच्या नव्या संचालक मंडळाला रिझर्व बँकेने जबरदस्त दणका दिला आहे. एसटी को. ऑप. बँकच्या नव्या संचालक मंडळाने कामगारांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.मात्र हे निर्णय घेताना भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने निर्णय स्थगित करण्याची नामुष्की बँकेवर आली आहे. त्याच प्रमाणे मृत खात्यांबाबत कोणताही खुलासा वेळेत व समाधानकारक न दिल्याने तब्बल दोन लाखांचा दंड रिझर्व्ह बँकेने एसटी बँकेला ठोठावला आहे. 70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.
नियोजन शून्य व ढिसाळ कारभारचा एसटी बँकेला फटका बसला आहे
या सर्व प्रकाराला बँकेच्या व्यवस्थापनाचा नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे हे घडले असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग यांनी केला आहे. बँकेची वार्षिक सर्व साधारण सभा होत असून त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे आरोप केले आहेत.
www.konkantoday.com