रत्नागिरीत सत्त्व आयुर्वेद चिकित्सालयाचे उद्घाटन.
रत्नागिरी* : येथील डॉ. विक्रांत पाटील यांच्या सत्त्व आयुर्वेद चिकित्सालयाचे उद्घाटन आई सौ. उज्ज्वला व वडिल अरुण पाटील यांच्या हस्ते झाले. मारुती मंदिर येथील शिवरेकर प्लाझामधील गाळा नं. ३ येथे हे चिकित्सालय सुरू झाले आहे.डॉ. विक्रांत यांचे शालेय शिक्षण आगाशे विद्यामंदिर व पटवर्धन हायस्कूल येथे झाले. बारावीनंतर गोवा येथील गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण आणि नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात एमडी आयुर्वेद पूर्ण केले. शालेय जीवनापासून आयुर्वेदिक वैद्य होण्याचे त्यांनी ठरवले होते. शिक्षण सुरू असताना (कै.) वैद्य रघुवीर भिडे आणि (कै.) वैद्य अनिल पानसे यांचे मार्गदर्शन वैद्य विक्रांत यांना लाभले आहे.चिकित्सालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला धनंजय दाते व सौ. दाते, युवराज पाटील, उत्तम जैन, सेवानिवृत्त शिक्षक गणेश गुळवणी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, राजेंद्र कांबळे, एलआयसीचे विमा विकास अधिकारी अनंत गोखले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्य विक्रांत हे सत्त्व चिकित्सालयात मंगळवार ते शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत रुग्ण तपासणी करणार आहेत. तसेच शनिवार व सोमवारी कासारवेली येथील रघुवीर चिकित्सालयात रुग्णांची तपासणी करणार आहेत.