मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही”,-शरदचंद्र पवार.

सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या अनुषंगाने मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करताना पाहायला मिळत आहेत. याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. देशातील शेती खात्याचा कारभार १० वर्ष मी सांभाळला. ज्यावेळी माझ्याकडे शेतीखात्याचं काम आलं तेव्हा पहिलं काम माझ्याकडे आलं होतं की अमेरिकेतून गहू आयात करायचे. परदेशातून तांदूळ आणायचे. मला त्यावेळी दु:ख झालं. शेतकरी कुंटुबात माझा जन्म झाला. आई-वडील शेती करतात. हा देश बळीराजाचा देश आहे आणि असं असतानाही गहू आणि तांदुळा सारखं धान्य परदेशातून आणायचं. ही गोष्ट आपल्याला पटणारी नव्हती. त्यामुळे मी तेव्हा हे आव्हान स्वीकारलं. गव्हाची आणि तांदळाची किंमत वाढवली. मी १० वर्ष या खात्याचं काम पाहिलं आणि २०१४ मध्ये मी त्या खात्याचं काम सोडलं. त्यावेळी मला सांगायला अभिमान वाटतो की, भारत देश १० वर्षात जगातील गहू निर्यात करणारा दोन नंबरचा देश बनला. कृषीमंत्री असताना देशातील सर्व शेतकऱ्यांचं ७१ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं”, असंही शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button