महामार्गावर गणेशोत्सवात यंदा शून्य प्राणांतिक अपघात.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गासह अन्य राष्ट्रीय राज्य मार्गानी येणार्‍या व जाणार्‍या चाकरमान्यांचा महामार्ग वाहतूक पोलीस शाखेकडून राबवण्यात आलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे यंदा शून्य प्राणांतिक अपघाताचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. याचबरोबर किरकोळ अपघातांचेही प्रमाण कमी करण्यात आले आहे. एकीकडे जिल्ह्यातील सर्वच राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण चौपदरीकरणाचे काम व इतर कारणांनी दुरवस्था झालेली असतानाही महागाई वाहतूक पोलीसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय राखत अपघात होणार्‍या ब्लॅक स्पॉटसवर व इतर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच मृत्यूंजयदूत हा महत्वाकांक्षी उपक्रम उत्तमरित्या राबवल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button