
मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाला शासनामार्फत ५ लाख रुपयांची आर्थिक मदत
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी राज्य शासनाची मदत*
बेळगावातील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांना शासनामार्फत ५ लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मदत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी तळमळीने प्रयत्न केले. आज शिक्षक दिनानिमित्त ही आर्थिक मदत मिळाल्याने श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्यावतीने माननीय डॉ. उदय सामंत सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
मराठी भाषा ही ज्ञानाची भाषा असून शिक्षण व प्रगतीच्या सर्व क्षेत्रांना दिशा देणारी आहे. याच मायमराठीच्या संवर्धनासाठी तसेच मराठमोळी वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात असल्याचं मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले
या कार्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. रोहनजी बने तसेच इतर कार्यकर्त्यांनी देखील विशेष परिश्रम घेतले होते




