आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त १५ सप्टेंबर रोजी संविधान मंदिर उद्घाटन रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
भारताला जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाचे केंद्र बनवण्याच्या स्वप्नामुळे आपण सर्वजण प्रेरित आहोत. युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्यावतीने संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण झालेल्या एल्फिस्टन महाविद्यालय, आयटीआय, मुंबई येथे संपन्न होणार आहे. राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी एकाचवेळी हा कार्यक्रम कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला जाणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आजीमाजी विद्यार्थी, पालक व संविधानाची जाण असणारे समाजसेवक व स्थानिक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.000