भाजपाचा एक नेता समितीत स्थान दिले म्हणून नाराज तर दुसरा नेता समितीत स्थान न दिल्याने नाराज
* राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीच्या आधीच भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगलं आहे. महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. या प्रचार समितीवरून भाजपमधील दोन बडे नेते नाराज असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे एका नेत्याने तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रसाद लाड यांनी उघडपणे भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.भाजपचे नेते रावसाहेव दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या व्यवस्थापन समितीत किरीट सोमय्या यांना निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु किरीट सोमय्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. मला न विचारता घोषणा कशी केली ? ही पद्धत चुकीचीआहे. असे म्हणत किरीट सोमय्यांनी रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत पत्र धाडलं आहे.तर दुसऱ्या बाजूला महायुती सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने भाजपची भूमिका मांडत आहे. मराठा आरक्षणासंदर्भातही मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडत आहे. परंतु तरीही पक्षाने समितीत स्थान दिले नाही. असे म्हणत प्रसाद लाड यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एका नेत्याला समितीत स्थान दिले त्यामुळे नाराज आहेत. तर दुसऱ्या नेत्याला समितीत स्थान दिले नाही म्हणून तेही नाराज असल्याचे दिसून येत आहे.