जिल्ह्यात आज 1 लाख 15 हजार 234 गौरीगणपतीचे तर 17 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन.
रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 234 घरगुती तर 17 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहे. पोलिस दलातर्फे समुद्र किनार्यावर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोस्त ठेवण्यात येणार आहे.जिल्ह्यात ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. त्यानंतर दीड दिवसाच्या 12 हजार गणपतीचे विसर्जन झाले. यानंतर आता गौरी गणपती विसर्जन आज ( गुरुवारी ) करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील भाट्ये व मांडवी किनारी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्रकिनारी अथवा पाणवठ्यावर विसर्जन होते. यापुर्वीचे विसर्जन नागरिकांनी शांततेत केले. जिल्ह्यात आज 1 लाख 15 हजार 234 गौरीगणपतीचे तर 17 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन थाटात होणार आहे.