आमदार योगेशदादा कदम यांच्या गणेशोत्सव शुभेच्छा बॅनर अज्ञातानी फाडला.

दापोली -खेड – मंडणगड तालुक्याचे आमदार योगेशदादा कदम यांच्या गणेशोत्सव शुभेच्छा बॅनरवरील त्यांच्या सौभाग्यवतींच्या फोटोचे विडंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ दापोली खेड रस्त्यावर टाळसूरे वाकण येथे शिवसेना नेते निलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आले. अज्ञाताने काल रात्री शुभेच्छा बॅनर फाडून विटंबना केल्याचे आज लक्षात आल्यानंतर त्या विकृत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी टाळसूरे येथे रस्ता रोको करण्यात आले. यामुळे वहातूकीचा काही काळ खोळंबा झाला होतापोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर निलेश शेठ यांनी कार्यकर्त्यांसह दापोली पोलीस स्थानकात या बाबत निवेदन सादर केले. गौरी विसर्जनानंतर तालुकाभर या कृत्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती निलेश शेठ यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button