भरणेत जगबुडी नदीपात्रात दुचाकी कोसळली अपघातात दोघेजण जखमी.
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनजिक मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच मदतकर्त्यांह पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.मुंबईहून गोव्याच्या दिशेन जात असताना दुचाकीला अपघात घडला. कठड्यामुळे दुचाकीवर दोघे रस्त्यावर कोसळले. तर दुचाकी नदीपात्रात कोसळल्याने नुकसान झाले. दोन्ही जखमींना नजिकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. www.konkantoday.com