चिपळूण शहरवासियांची उत्सुकता लागून राहिलेल्या चिपळूण शहराच्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेसाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरू
* चिपळूण शहरवासियांची उत्सुकता लागून राहिलेल्या चिपळूण शहराच्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेसाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. जीएसटी व अन्य कर वगळून सुमारे १२४ कोटी ३५ लाख रुपयांची निविदा शनिवारी चिपळूण नगर परिषद पाणी पुरवठा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. २६ सप्टेंबरपर्यंत या निविदेची मुदत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मे २०२५ अखेर शहरातील नागरिकांनी ग्रॅव्हिटी योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. www.konkantoday.com