गौराईची आरती करत पदर खोचून आदिती तटकरे यांनी गौर डोक्यावर घेतली.
अवतरली गौराई गं!… गणरायांच्या आगमनामागोमाग आता घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं आहे. घराघरातील महिला वर्ग या गौराईच्या आगमनासाठी आणि तिच्या पूजेसाठी हिरीरिनं सहभाग घेताना दिसत असून, राज्याच्या राजकारणात आघाडीवर असणाऱ्या आणि कायमच चर्चेत असणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीसुद्धा त्यांच्या घरी गौराईचं स्वागत केलं.सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला. जिथं कुटुंबातील महिलावर्गाच्या साथीनं आणि गावाकडे असणाऱ्या इतर अनेक महिलांच्या साथीनं आदिती तटकरे यांनी गौराईचं स्वागत केलं. अतिशय पारंपरिक पद्धतीनं तटकरे कुटुंबीयांनी गौराईचं स्वागत केलं.पाणवठा आणि रानाच्या ठिकाणी जात तिथं जमिनीचा काही भाग सारवत त्यावर पानविडा मांडून त्याची पूजा करण्यात आली. ज्यानंतर गौराईची आरती करत पदर खोचून आदिती तटकरे यांनी गौर डोक्यावर घेतली. आपण आधुनिकतेच्यासाथीनं कितीही पुढे आलो असतो तरीही परंपरा आणि सण- उत्सवांचा विसर अद्यापही पडला नाहीय, हेच त्यांच्या या सुरेख कृतीतून पाहायला मिळालं.सोनपावलांनी आली गौराई घरात,चैतन्य येऊ दे सर्वांच्या जीवनात !आज आमच्या निवासस्थानी गौराईचे आगमन झाले. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरु असली तरी गौराईसोबत येणारं चैतन्य हे नेहमीच नावीन्यपूर्ण असतं. गौराईचे अतिशय आनंदाने स्वागत करून सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केली.…