
कणकवली शहरातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या आग, आगीत मोबाईल व इतर साहित्य जळून खाक
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला आज, सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागली. आगीत मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.आज, सकाळी सात वाजता आग लागल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले. दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाळेधारकांना फोन केले. राजस्थान येथील व्यापारी असलेल्या जय श्री मोबाईल दुकानच्या मालकाला देखील फोन करण्यात आले. मात्र, तो येईपर्यंत दुकानातील फर्निचर व माल जळून खाक झाला होते. या मोबाईल शॉपिला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.www.konkantoday.com