
कोहिनूर हॉटेल चोरीप्रकरणी देवरूख येथील एका संशयितास अटक
रत्नागिरी शहरानजिकच्या कोहिनूर हॉटेल मॅनेजमेंटच्या बंद इमारतीमधील नासधूस करून चोरी प्रकरणातील एका संशयिताच्याा शहरातील कोकणनगर येथून पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत.कोहिनुर हॉटेल मॅनेजमेंटच्या बंद इमारतीत इलेक्ट्रीक सामान, बाथरूम फिटींगचे सामान, इमारतीच्या काचा, बेसीन, दरवाजे फोडून तब्बल ४ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले होते. समीर मंगेश लिंबुकर (२९, रा. साडवली, देवरूख) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चोरीची ही घटना रविवार ५ मे रोजी दुपारी ३ ते शनिवार ११ मे रोजी सकाळी ११ या कालावधीत घडली होती. याप्रकरणी हॉटेलचे कर्मचारी विजयेंद्र ओमप्रकाश सिंग (४३, मुळ रा. भाईंदर सध्या रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. www.konkantoday.com