महिलेला वाचवण्यासाठी एक शाळकरी मुलगी बाहुबली बनली, चक्क रिक्षा उचलली, पहा व्हिडिओ.
सोशल मीडियाच्या दुनियेत असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात, इथे कधीकधी असे काही कौतुकास्पद व्हिडीओ ही व्हायरल होतात.ज्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.हा व्हिडीओ एका रिक्षा अपघाताचा आहे. आता तुम्ही म्हणाल की अपघाताचं कसलं कौतुक करताय? तर हा अपघात घडल्यानंतर जी घटना घडली ती कौतुकास्पद आहे. हे संपूर्ण प्रकरण जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.रस्त्यावर एका रिक्षाचा तोल गेल्याने ही रिक्षा पडली, पण या रिक्षाखाली एक महिला अडकली होती. या महिलेला वाचवण्यासाठी एक शाळकरी मुलगी पुढे सरसावली आणि तिने तिच्या ताकदीचा वापर करुन ती रिक्षा या महिलेच्या अंगावरुन उचलली. ज्यामुळे या महिलेला त्या रिक्षाच्या बाहेर काढणं शक्य झालं.एका शाळेतील मुलीने एवढं धाडस आणि तत्परता दाखवणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. खरंतर हा अपघात पाहताच क्षणी या मुलीनं जराही विलंब न करता ती मदतीसाठी धावली. ज्यामुळे तिचं कौतुक होत आहे.हे प्रकरण नक्की कुठे घडलं आणि कधी घडलं हे कळू शकलेलं नाही. शिवाय या महिलेच्या प्रकृतीबद्दल देखील कळू शकलेलं नाही पण हा व्हिडीओ Sanjay Kumar, Dy. Collector या अकाउंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ 8 सप्टेंबर म्हणजे रविवारचा असल्याचे कळत आहे.