रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस घडली. विश्राम कृष्णा परवडे (६७, रा. कोतवडे- लावगणवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्राम परवडे हे ४ सप्टेंबर रोजी कामाला जातो, असे सांगून घरातून निघून गेले होते. सायंकाळी ते घरी न आल्याने नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास कोतवडे नदीमध्ये विश्राम यांचा मृतदेह आढळला.