..तर गणेशोत्सवात जिल्ह्यात धान्य वितरण बंद ठेवणार.
. धान्य वितरणाचे थकित कमिशन तातडीने न दिल्यास गणेशोत्सवात जिल्ह्यात धान्य वितरण बंद ठेवण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक मालक संघटनेने शासनाला दिला आहे. ही माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी पत्रकारांना दिली.ते पुढे म्हणाले की, जिल्हा पुरवठा विभागाने फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै व ऑगस्ट या पाच महिन्यांचे प्रती क्विंटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन दुकानदारांना दिलेले नाही. यामुळे सध्या दुकानदार अडचणीत आले आहेत. याबाबत जिल्हास्तरावर मागणी करूनही त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळे दुकानदारांना सतत मोफत धान्य वितरण करून शासन सवंग लोकप्रियतेसाठी दुकानदारांची उपासमार करीत आहे. गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी कमिशन मिळत नसल्याने दुकानदार नाराज आहेत.www.konkantoday.com