
जेव्हा एखादं काम प्रामाणिक आणि लोकोपयोगी असते तेव्हा लोक नक्की दखल घेतात आणि दखल घ्यायला भाग पाडतात….माननीय नीलेशजी सांबरे साहेबांनी रत्नागिरी करांसाठी दिलेल्या अनोख्या भेटीची झलक…
मयूर भितळे, सोमेश्वर यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त साकारलेले श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी….
पैसा असून चालत नाही तर दातृत्वही गरजेचे असते. जिजाऊ संस्थेचे श्री निलेशजी सांबरे यांनी रत्नागिरी सुरू केलेल्या मोफत रुग्णालयात सतत रुग्णांची गर्दी होत आहे. या रुग्णसेवेने भारावलेल्या रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर भितळे या तरुणाने मोफत रुग्णालयाचा देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. सोमेश्वर येथील भितळे कुटुंब दरवर्षी गणेशोत्सवात एक वेगळी संकल्पना घेऊन देखावा तयार करत आले आहेत ,या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न भितळे कुटुंबांचा असतो. यापूर्वी त्यांनी गोवर्धन ,सिंधुताई सपकाळ, शेतकऱ्याची आत्महत्या या विषयावर देखावे तयार करून सादर केले आहेत. या वर्षी मोफत रुग्णालयाचा देखावा साकारण्यात आला आहे.मयूर व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. व्यवसाय सांभाळून तो गणेशोत्सवात विविध सामाजिक विषय देखाव्याच्या माध्यमातून हातात असतो. यावर्षी जिजाऊ प्रतिष्ठानच्या मोफत रुग्णालयाची प्रतिकृती साकारली आहे .संपूर्ण श्रावण महिना त्याने या देखाव्याची उभारणी केली विशेष म्हणजे हा देखावा साकारताना जिजाऊ संस्थेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.अँड महेंद्रजी मांडवकर सर आणि जिजाऊ संस्थेचे सचिव श्री.केदार चव्हाण सर देखावा साकारताना प्रोत्साहन दिले व मदत केली आहे. मयूर याला हा देखावा तयार करण्यासाठी शुभम आग्रे ,तेजस खापरे, सौरव बळकटे ,संजय खापरे आणि मारुती लोहार यांनी मार्गदर्शन केले. हा देखावा सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. देखावा हा हुबेहूब श्री.भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी च्या मुख्य इमारतीप्रमाणे आहे. आजपर्यंत जवळपास 2000 नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. अनंत चतुर्दशी पर्यंत हा देखावा लोकांना पाहण्यासाठी खुला आहे.




