
मंजूर संस्थांचे प्रश्न मार्गी लागणार, सहकारमंत्र्यांचे आश्वासन
मंजूर संस्थांचे प्रश्न मार्गी लावा अशी मागी महाराष्ट्र राज्य लेबर फेडरेशनने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे महिनाभरापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेण्यात आली असल्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.
मजूर संस्थांना ३३ टक्के कोट्याप्रमाणे कामे मिळावीत या प्रमुख मागणीसह १० मागण्यांचे निवेदन महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्य लेबर फेडरेशनने सहकार मंत्री पाटील यांना दिले आहे.
त्यानुसार मंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राज्य सहकारी संघाचे चेअरमन प्रवीण दरेकर, राज्य लेबर फेडरेशनचे चेअरमन संजीव कुसाळकर, उपाध्यक्ष अशोक कदम, सचिव खेराडे, प्रमुख संचालक मोरे, रत्नागिरी जिल्हा संघाचे माजी चेअरमन, संचालक राकेश जाधव, सहकार विभागाचे आयुक्त, सचिव व प्रमुख अधिकार्यांची बैठक घेतली.
www.konkantoday.com




