चिपळूणची सुकन्या अभिनेत्री साक्षी गांधीचे छोट्या पडद्यावर पुन्हा आगमन

चिपळूणची सुकन्या साक्षी गांधी ही लॉकडाऊननंतर पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडावून सुरू असल्याने सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचे चित्रिकरण बंद होते. मात्र आता शासनाच्या नियमांचे पालन करीत खबरदारी बाळगून मालिकेचे चित्रिकरण सुरू करण्यात आले असल्याचे साक्षीने सांगितले. या मालिकेत साक्षीने अवनी नावाची भूमिका साकारली आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला पसंती दिली आहे. याचा आनंद असल्याचेही साक्षी म्हणाली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button