एकनाथ शिंदेसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी राष्ट्रवादीची काँग्रेसची नवी घोषणा.
विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिलेल्या आदेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय आहे?याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी नवी घोषणा द्यायला सुप्रिया सुळे यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायची नाही. सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, असे आदेश सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिले आहेत. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका कुणीही करणार नाही, आपण आरक्षणाच्या बाजूने आहोत, असं सुप्रिया सुळे बैठकीत म्हणाल्या.तसंच अजित पवारांना कुणीही सहानुभूती दाखवणार नाही, असे आदेशही सुप्रिया सुळेंनी बैठकीत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार-एकनाथ शिंदे या नव्या समिकरणाची तयारी तर सुरू झाली नाही ना?अशा चर्चा रंगल्या आहेत.