उत्तेजक औषधांचा साठा, तरूणाला ५० हजारांचा जामीन
. रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे परवाना नसताना उत्तेजक औषधे बाळगणार्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. आरोपी साईराज रमेश भाटकर (रा. मिरजोळे, रत्नागिरी) याला सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.साईराज भाटकर याच्या ताब्यातील ३ हजार ७०० रुपयांची औषधे पोलिसांनी जप्त केली. त्याने आपल्या मिरजोळे एमआयडीसी येथील घरामध्ये उत्तेजक औषधांचा विनापरवाना साठा करून ठेवला होता, तसेच ही औषधे वैद्यकीय अधिकार्यांच्या अथवा डॉक्टरांच्या औषध चिठ्ठीशिवाय व्यायामशाळेत जाणार्या मुलांना विक्री करण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी साईराजच्या घरी छापा टाकला. यावेळी साईराजच्या घरामध्ये विविध उत्तेजक औषधांचा साठा आढळला. शेड्युल्ड एज प्रकारची औषधे त्याच्या ताब्यात सापडली.www.konkantoday.com