सौ अंजली संतोष पिलणकर यांना लायन्स क्लब रत्नागिरी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
रत्नागिरी दिनांक 04/09/2024, मराठा मंदिर अ.के देसाई हायस्कूल रत्नागिरी प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका सौ अंजली संतोष पिलणकर यांना लायन्स क्लब रत्नागिरी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे . सौ.अंजली संतोष पिलणकर या मराठा मंदिर अ.के देसाई हायस्कूल रत्नागिरी या प्रशालेत 25 वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहेत. यादरम्यान त्यांनी इंग्रजी विषयांतर्गत विभाग ,जिल्हा व तालुका स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. इंग्रजी विषयांतर्गत विविध उपक्रम ,शिबिरे यांचे आयोजन करून शाळेचा इंग्रजी विषयाचा एस.एस.सी.बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत .या आधी माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.रत्नागिरी तर्फे त्यांना महाराष्ट्र छात्र सेना-आदर्श शिक्षक पुरस्कार( 2014-15)प्राप्त झाला असून स्काऊट-गाईड विभागाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट गाईडर पुरस्कार सन (2021-22 ) जाहीर झाला आहे. या विषयातही विविध प्रशिक्षणे घेऊन विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी देखील मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या 14 विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.अध्यापनासोबतच निबंध स्पर्धा,काव्य लेखन,गीत गायन या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून विविध सेवा प्रकल्पात सहभाग घेऊन सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे. लायन्स क्लब,रत्नागिरी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मराठा मंदिर मुंबई संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापिका श्रीमती दळी पी.डी.व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.