शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं, पहा व्हिडिओ.
* छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटना प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता. पण पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतले आहे. जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट जारी केली होती. आपटे पुतळा कोसळल्यापासून फरार होता. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी जयदीपला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जयदीप सापडल्यामुळे आता या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडण्याची शक्यता आहे.