काजू बी शासन अनुदान योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-ऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे.* राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांना काजू बी साठी शासनाकडुन वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतक-यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज,संमतीपत्र, ७/१२, कृषी खात्याचा दाखला, जी. एस. टी. बील, बँक तपशिल,आधार कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अधिक माहीतीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. अथवा श्री.पवन बेर्डे, कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ (७२१८३५००५४) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, एमआयडीसी कुडाळ, हापुस आंबा निर्यात सुविधा केंद्र जामसंडे ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button