कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात प्रवासी सुखरूप.

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये 80 प्रवासी होती. पण सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या दोन बस कंटेनरवर धडकल्यामुळे अपघात झाला आहे. पण, ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी… दैव बलवत्त म्हणूनच 80 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारला, त्यामुळे मागून येणाऱ्या प्रवाशांनी फुल्ल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आणि भीषण अपघात झाला. सुदैवानं बसमधील 80 प्रवासी सुखरुप बचावले आहेत. तसेच, बाजूनं जाणारा दुचाकीस्वारही थोडक्यात बचावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button