रिळ, उंडी गावामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापणार
. रत्नागिरी तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांनी नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये १५३ हेक्टर जमीन रिळची तर ६० हेक्टर जमीन उंडी गावातील संपादित करण्यात येत आहे. संपादित होणार्या क्षेत्राचा शासकीय दराच्या चारपट एवढा मोबदला मिळणार आहे.यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे चौकशी केली असता सांगण्यात आले की, रिळ गावातील १३६ सातबारावरील १५३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. तर उंडी गावामध्ये ४९ सातबारा भागांवरील ६० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. एकूण २१३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या चारपट एवढा मोबदला मिळेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने महसूल विभागाला कळवले आहे की, भूसंपादन कायदा २०१३ च्या कलम २६ ते ३० दरम्याने नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणे मोबदला परिगणना करण्यात यावी. हा मोबदला जमीन मालकांना देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने दाखवली आहे. खंडाळा हा परिसर औद्योगिक, केंद्र म्हणून पुढे येत आहे.www.konkantoday.com