महाड बिरवाडी येथील चोरी प्र्रकरणातील तिसरा आरोपी खेड पोलिसांच्या जाळ्यात

खेड ः महाड बिरवाडी येथे घरफोडी करून नदीत उडी मारून पसार झालेल्या चोरट्याला खेड पोलिसांनी मोरवंडेनजिकच्या जंगलमय भागात सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पकडले. महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एक ज्वेलर्स दुकान, तीन फ्लॅट व एक घर फोडून सहा चोरट्यांनी पलायन केले होते. त्यातील तीन चोरटे सजनसिंग उर्फ अर्जुनसिंग कमरू डवर (४५, मध्यप्रदेश), दिनेश धनसिंग आलावा (मध्यप्रदेश), जितेन भालसिंग मनलोई (मध्यप्रदेश) तालुक्यात आल्याची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत हे तिन्ही संशयित सापडले. परंतु त्यातील एका संशयिताला तेथून पळ काढण्यात यश आले होते. परंतु पोलीस उपविभागीय अधिकारी प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महाड पोलिसांच्या मदतीने कोंबींग ऑपरेशन करुन तिसर्‍या संशयिताला पकडण्यात यश आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button