जुलै महिन्यात पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको केल्या बद्दल माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राउळ यांच्या सह इतर चोवीस जणांवर गुन्हे दाखल

. जुलै महिन्यात एमआयडीसी मधील रस्त्यावर वासराची मान कापलेली निदर्शनास आले होते. यानंतर रत्नागिरीत संतापाची लाट उसळली होती. ग्रामीण पोलीस ठाण्यावर सतत दोन दिवस नागरीकांनी आंदोलन करुनही पोलीसांनी आरोपीवर कारवाई केली नव्हती याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून सात जुलै रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. या मोर्चात भर पावसात हजारोंच्ये संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच नेतृत्व माजी खासदार निलेश राणे यांनी केल होत. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जेल नाका येथे लोकांनी उत्फुर्त रास्ता रोको करत जवळपास चार तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. यानंतर पोलीसांनी आरोपीवर कारवाई केली होती. आता मोर्चा काढून रास्ता रोको केल्याबद्दल पोलीसांनी निलेश राणे, बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राऊळ यांसह सकल हिंदू समाजाच्या इतर चोवीस जणांवर गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button