सप्टेंबरमध्ये मोठा धमाका! ग्राहकांनो, बाजारपेठेत दाखल होणार ‘या’ ५ नव्या कार; एकदा यादी पाहाच, टाटाचाही समावेश!!

जर तुम्ही या सप्टेंबर महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण आम्ही तुम्हाला त्या गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या या महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार आहेत. कारप्रेमींसाठी हा महिना खूप रोमांचक असणार आहे कारण, बाजारात अनेक कार दमदार फीचर्ससह दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये इलेक्ट्रिक कारचाही समावेश असणार आहे. चला तर या महिन्यात कोणत्या कार लॉन्च होणार आहेत, जाणून घेऊया…**सप्टेंबरमध्ये ‘या’ कार होणार लाँच**Tata Curvv ICE*पहिल्या कारचे नाव आहे Tata Curve जी २ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीने आपले इलेक्ट्रिक मॉडेल आधीच लॉन्च केले होते, त्यानंतर आता ते पेट्रोल आणि डिझेल मॉडेलमध्ये आणले जात आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ११ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत असू शकते. याचे बेस आणि मिड व्हेरिएंट Nexon च्या १.२L टर्बो पेट्रोल इंजिनसह सादर केले जातील.*Mercedes-Benz Maybach EQS 680*दुसरी कार Mercedes-Maybach EQS आहे जी ५ सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. ही कार गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. कंपनीच्या भारतीय लाइनअपमधील हे एक नवीन मॉडेल असेल, जे मर्सिडीज-मेबॅक जीएलएस एसयूव्हीमध्ये सामील होईल.*Hyundai Alcazar Facelift*Hyundai ची ही कार ९ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. ९ सप्टेंबर रोजी बाजारात दाखल होणारी ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पॉवरट्रेनसह येणार आहे. कंपनीने या कारचे बुकिंगही सुरू केले आहे. २५ हजार रुपये टोकन रक्कम जमा करून अल्काझार फेसलिफ्टचे बुकिंग करता येईल.*MG Windsor EV*MG Windsor EV ही एक नवीन इलेक्ट्रिक SUV आहे, जी भारतात ११ सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाऊ शकते. यात एक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर असेल जी सुमारे २०० hp पॉवर आणि ३५० Nm टॉर्क प्रदान करू शकते. ही SUV लाँग ड्रायव्हिंग रेंज आणि नवीन तंत्रज्ञानासह बाजारात येऊ शकते. त्याची किंमत २५ ते ३० लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.*Tata Nexon CNG*पाचव्या कारचे नाव आहे Tata Nexon CNG जी या महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी अनेक दिवसांपासून याची चाचणी करत आहे. ही कार २०२४ च्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. त्याच्या लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button