
बांधकाम आणि बांधकामांशी संबधित दुकाने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट
राज्यात १५ ते २० मे या कालावधीत तोउक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरे आणि अन्य बांधकामांची झालेली पडझड आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
बांधकांमांची दुरुस्ती व मजबुतीकरण ही कामे थांबू नयेत यासाठी बांधकाम आणि बांधकामांशी संबधित दुकाने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केली आहेत. या दुकानांना निर्बंधांमधून मुभा देण्यात आली असून नियमानुसार ही दुकाने सुरू राहणार आहेत.
www.konkantoday.com