शिवाजी हायस्कूलच्या इतिहासात प्रथमच तब्बल 5 विद्यार्थ्यांची शालेय विभागीय कुस्तीकरिता स्पर्धेकरिता निवड.
रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी येथील खेळाडूंनी ऐतिहासिक सुयश संपादन केले आहे. सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे उत्सफूर्त प्रतिसादात संपन्न झाल्या.यामध्ये14 वर्षाखालील मुलींच्या गटातरुद्रा अजित चव्हाण -33 किग्रॅ वजनी गट – प्रथम क्रमांकतसेच 14 वर्षाखालील मुलांच्या35 kg वजनी गटात साईराम महीपती जाधव द्वितीय क्रमांक तर 41 किलो वजनी गटामध्ये वेदांत रामदास खोत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे .44 किलो वजनी गटात हर्ष रवी बैरागर – प्रथम क्रमांक ,विशेष म्हणजे 62 किलो वजनी गटात आर्यन रमेश चव्हाण या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे .त्याचप्रमाणे 68 kg वजनी गटात विकास चंद्रकांत पाटील याने प्रथम क्रमांक संपादन केला आहे.यामधील प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या तब्बल 5 खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेकरिता झाली आहे .यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्वतः कुस्तीपटू असलेले श्री एम. डी. पाटील, तानाजी गायकवाड, दीपक पाटील, अमोल मंडले, अशोक सुतार, शिक्षिका स्वप्नाली भुजबळराव, सैफुद्दीन पठाण, वसतिगृह अधिक्षक गजानन बागडी, सागर कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे , सचिवा सौ शुभांगी गावडे , आजीव सेवक तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विद्यालयाचे थोर देणगीदार सुनिल भोंगले, सामाजिक कार्यकर्ते व देणगीदार नितीन जाधव, रोटरी क्लबच्या शाल्मली आंबूलकर, मुख्याध्यापक श्री ए. डी. पाटील, सुखीता भावे, डॉ. पल्लवी यादव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रीतम पिलणकर व अशोक पवार, शिक्षक पालक व माता पालक संघ उपाध्यक्ष वैशाली मापुस्कर याबरोबरच संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या कुस्तीपटूंसह मार्गदर्शक तानाजी गायकवाड क्रीडाशिक्षक एम डी पाटील व सागर कदम .