
रत्नागिरी शहरात आता सिग्नलमुळे सुरू झाली आहे वाहतूककोंडी
नळ पाणी योजनेंतर्गत रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून यासाठी मध्यभागी रस्ता खोदण्यात आला आहे. जेलनाका येथील सिग्नलमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा जिल्हा परिषदेपर्यंत लागतात.तर मारुती मंदिर येथे ही खोदाई करण्यात आल्यामुळे वाहनाच्या रांगा लागतात अनेक भागात रस्ते खोदल्यानंतर ते बुजविण्यात आले नसल्यामुळे वाहनानी पार्किंग कुठे करायचे ही समस्या उभी राहिली आहे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सिग्नल बंद ठेवल्यास वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होईल
www.konkantoday.com