रत्नागिरी मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमध्ये स्थानापन्न असलेल्या मावळ्यांची विटंबना झाल्याची घटना, संतापाचे वातावरण


रत्नागिरी मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमध्ये स्थानापन्न असलेल्या मावळ्यांची विटंबना झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे याप्रकरणी शिवसेना पक्षाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अधिक , आज सकाळी मारुतीमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याजवळ असलेल्या शिवसृष्टीतील काही मावळ्यांची विटंबना झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वार्‍यावरच ही बातमी सर्वत्र पसरली आणि त्याची दखल तत्काळ घेवून शिवसेना पक्षातर्फे पोलिसांकडे धाव घेण्यात आली. विटंबना करणार्‍या आरोपीला तत्काळ पकडून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, विजय खेडेकर, अभिजीत दुडे, प्रशांत सुर्वे, दिपक पवार यांनी पोलिसात निवेदन दिले आहे. दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संतापजनक प्रकाराने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button